पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | मांजरी (Manjari, Pune) येथील घरात शिरुन पाच चोरट्यांनी तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम चोरुन नेऊन दरोडा (Robbery) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी अमर मौला तांबोळी Amar Maula Tamboli (वय ४१, रा. मांजरी रेल्वे स्टेशनजवळ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ५ जणांवर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder), दरोड्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना मांजरी येथील गोपाळपट्टी भागात २५ डिसेबर रोजी रात्री पावणे अकरा वाजता घडला. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र गोकुळ वर्मा हे घरी जेवण करत होते.
त्यावेळी पाच जणांनी घराचा दरवाजा जोरात ढकलून आत प्रवेश केला. त्यांच्यातील एकाने कोयता उगारुन फिर्यादी यांच्या पाठीवर उलटा कोयता मारुन जखमी केले. तसेच दुसर्याने गोकुळ वर्मा यांच्या गळ्याला चाकू लावून आवाज करु नका, नाही तर खल्लास करीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. फिर्यादी व त्यांच्या मित्राचा मोबाईल फोन व रोख रक्कम असा १४ हजार ६५० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरुन ते पळून गेले. या प्रकाराने घाबरुन गेल्याने तांबोळी यांनी कोणालाही याची माहिती दिली नाही. मंगळवारी त्यांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Robbery at Cats; They entered the house and robbed it
हे देखील वाचा :