पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | वडिलांच्या दशक्रियाविधीसाठी तुरुंगातून बाहेर आलेल्यास भेटायला गेल्याने विरुद्ध टोळीतील गुंडांनी राडा घालून चौघांवर कोयता, कुर्हाडीने वार केले. गाड्यांची तोडफोड करुन मिनाताई ठाकरे वसाहतीत दहशत निर्माण केली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Pune Police) चौघांना अटक केली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या घटनेत प्रकाश तुळशीराम पवार (वय १९, रा. मिनाताई ठाकरे वसाहत) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तसेच सुर्या ऊर्फ सुरज ताज मोहम्मद सिद्दिकी, राकेश ऊर्फ लल्लु रतन सरोदे, आदित्य कुंडलीक साखरे यांच्यावर वार करुन जखमी करण्यात आले आहे.
स्वारगेट पोलिसांनी बालाजी उमाप, राहित जाधव, यश माने, रमेश ऊर्फ राजा मॅडम यांना अटक केली आहे. बालाजी उमाप आणि रमेश मॅडम हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी आकाश तुळशीराम पवार (वय २८, रा. वैद्यवाडी, हडपसर) यांनी स्वारगेट पोलिसांकडे (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६१/२३) दिली आहे. त्यावरुन सचिन परशुराम माने, बालाजी उमाप, अजय डिकळे, विजय डिकळे, पल्या पासंगे, आयुश माने, निखिल माने, रोहित जाधव, यश माने, रमेश ऊर्फ राजा मॅडम व त्यांच्या इतर साथीदारांवर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मिनाताई ठाकरे वसाहत, खड्डा, लक्ष्मीबाई मंदिरासमोर व क्रिसेंट हायस्कुल येथील गितांजली अपार्टमेंट येथे रविवारी रात्री दहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनाताई ठाकरे वसाहतीत राहणारा सोहेल बादशहा शेख हा खूनाच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. २५ फेब्रुवारी रोजी त्याच्या वडिलांचे दहाव्याचे कार्यक्रमासाठी सुट्टी घेऊन बाहेर आला होता.
त्याला भेटायला फिर्यादीचा भाऊ प्रकाश व त्याचे साथीदार सोहेल याला भेटायला गेले होते.
सोहेल व बालाजी उमाप यांच्या कुटुंबियांमध्ये दुश्मनी आहे.
प्रकाश पवार त्याचे मित्र गितांजली अपार्टमेंटच्या समोर रविवारी रात्री उभे होते.
त्यावेळी सचीन माने व त्याचे साथीदार आले. त्यांनी गाड्यांची तोडफोड करत दहशत निर्माण केली.
सुरज आणि राकेश सरोदे यांच्यावर वार करुन जखमी केले.
त्यानंतर सव्वा दहा वाजता अजय डिकळे याने प्रकाशकडे बोट दाखवून याला मारा, असे म्हटले.
त्यावेळी निखील माने त्याने कुर्हाडीने प्रकाशच्या डोक्यात वार केले. तर इतरांनी कोयता आणि पालघनने वार केले.
हा प्रकार सुरु असतानाच आदित्य हा प्रकाश याला वाचविण्यासाठी आला असताना त्यालाही जखमी करण्यात आले.
टोळक्याने कोयते, पालघन, कुर्हाडी हवेत नाचवत परिसरात दहशत निर्माण केली. स्वारगेट पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिर्यादीचा भाऊ प्रकाश हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
तर त्याच्यावर हल्ला करणारे आरोपी देखील रेकॉर्डवरील आहेत.
सचिन माने हा प्रमुख गुन्हेगार असून, त्याच्यावर पूर्वी २०२० मध्ये तडीपारीची कारवाई झाली होती.
तर मार्केटयार्ड पोलिसांनी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली होती.
Web Title :- Pune Crime News | Rada came to meet the accused from jail; Cars vandalized, killed, axed in Minatai Thackeray Colony
हे देखील वाचा :
Jalna ACB Trap | ग्राहकाकडून लाच घेताना महावितरणच्या कर्मचाऱ्यासह एजंट ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात