बुलढाणा : बहुजननामा ऑनलाईन – Buldhana Crime News | बुलढाणा तालुक्यातील कोलवड शिवार परिसरातील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये एक घृणास्पद प्रकार घडला आहे. यामध्ये नराधम शिक्षकांनी दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित नराधम शिक्षकाविरुद्ध ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो फरार झाला आहे. (Buldhana Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित विद्यार्थी हे 10 वीच्या वर्गात अजिंठा मार्गावरील कोलवडनजीकच्या राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. ते दोघेही वसतिगृहात राहतात. धर्मेंद्र उत्तम हिवाळे असे दुष्क्रुत्य करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. ते विज्ञान विषय शिकवत होते. या विकृत शिक्षकाने प्रात्यक्षिकमध्ये कमी गुण देण्याची धमकी देत या विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. (Buldhana Crime News)
या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीनुसार सदर शिक्षकावर ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्यावर बुलढाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी धर्मेंद्र हिवाळे हा फरार झाला आहे.
पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Web Title :- Buldhana Crime News | two students were assaulted by a teacher in kolwad shivar area of buldhana taluka
हे देखील वाचा :
Jalna ACB Trap | ग्राहकाकडून लाच घेताना महावितरणच्या कर्मचाऱ्यासह एजंट ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात
Nashik ACB Trap | 40 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा लिपिक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात