पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळुन एकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घोरपडे पेठेतील (Ghorpade Peth) ओम साई ज्वेलर्सच्या समोर घडली. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात (Khadak Police Station) चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमन दिपक परदेशी, करण दिपक परदेशी, दिनेश परदेशी आणि तुषार रजपूत यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बलराम प्रताप परदेशी (40, रा. सर्व्हे नं. 41, देवकी बार शेजारी, घोरपडे पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बलराम परदेशी हे घोरपडे पेठेतील ओम साई ज्वेलर्सच्या समोरून दुचाकीवरून त्यांच्या मित्रासह कामानिमित्त जात होते. त्यावेळी अमन परदेशीने जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच्या हातातील लाकडी बॅटने बलराम यांच्या डोक्यात मारून त्यांना दुखापत करून जखमी केले. आरोपी करण परदेशी आणि तुषार रजपुतने बलराम यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गुन्हयाच्या घटनास्थळी खडक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी भेट दिली. गुन्हयाचा पुढील तपास मपोना धारूरकर करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Pune-Ghorpade Peth Crime News! Khadak Police Station: Crime against the four who brutally beat them due to prior enmity
हे देखील वाचा :