पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कंपनीच्या बाहेर रोडवर भांडण करणार्याचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कंपनीच्या मालकालाच भांडणार्यांनी कोयत्याने वार करुन त्यांचा खून (Murder in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा-केशवनगरमध्ये (Mundhwa-Keshav Nagar) घडला. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रवींद्र दिगंबर गायकवाड Ravindra Digambar Gaikwad (वय ६०, रा. गायकवाड आळी, मुंढवा) असे खून झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Pune Police) मोटारसायकलवरील तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
आकाश जावळे (वय १९), सागर जावळे (वय २२), साहिल सुतार (वय १९, तिघेही रा. मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सुन्द्रेंश सुभाषचं जैस्वार (वय ३९, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४४/२३) दिली आहे. हा प्रकार मुंढवा येथील केशवनगरमधील गायकवाड वस्ती येथे रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, रवींद्र गायकवाड यांची कल्याणी इंजिनिअरिंग (Kalyani Engineering) ही कंपनी आहे. फिर्यादी या ठिकाणी कामाला आहेत. कंपनीच्या बाहेर रोडवर रविवारी दुपारी तिघे जण आपसात भांडत होते. ते पाहून गायकवाड तेथे गेले. त्यांनी भांडणे मिटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी गायकवाड यांच्यावरच कोयत्याने डोक्यात,पाठीवर वार केले. दगडाने मारहाण करुन ते मोटारसायकलवरुन पळून गेले. जखमी अवस्थेत गायकवाड यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे (PI Pradeep Kakade) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Pune Crime News | Pune Crime News: Mundhwa Police Station – A company owner who went to settle a dispute was killed by throwing a stone on his head
हे देखील वाचा :