पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | आई मारहाण (Beating) करते, म्हणून चिडलेल्या ९ वर्षाच्या मुलीने आपली ६ वर्षाची बहिण आणि ५ वर्षाच्या भावाला घेऊन घरातून निघून गेली. हे समजताच लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने मुलांच्या शोधासाठी ४ पथके नेमली. त्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर कॅम्पमधील एका मशिदीबाहेर ही मुले आढळून आली. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी कदम वाक वस्तीत राहणार्या एका ३० वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती लोणी रेल्वे स्टेशन (Loni Railway Station) येथे काम करतो. फिर्यादी या रमजानच्या काळात मशीदीबाहेर भीक मागत असतात. त्या नेहमी आपल्या मुलांना मारहाण करीत. रागवत. यामुळे त्यांची ९ वर्षाच्या मुलगी चिडली. रविवारी सायंकाळी ती आपली ६ वर्षाची बहिण व ५ वर्षाचा भाऊ यांना घेऊन घरातून बाहेर पडली. रात्री मुले घरी न असल्याने फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तीन मुले एकाचवेळी बेपत्ता झाल्याने पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली. तातडीने चार पथके स्थापन करुन या मुलांचा शोध सुरु झाला. कदमवाक वस्तीपासून वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात हे तिघे जण बसने पुण्याकडे गेल्याचे दिसून आले. त्यानंतर पुण्यात शोध घेण्यात आला. कॅम्पमधील कुरेशी मशीदबाहेर ही मुले पोलिसांना मिळून आली. तब्बल ४ तासांच्या प्रयत्नांना यश आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पोलिसांनी चौकशी केल्यावर मुलीने सांगितले की, आई सतत रागवते, मारहाण करते, मारते म्हणून मी भाऊ बहिणीला घेऊन बसने पुलगेटला आले. तेथून कॅम्पमध्ये फिरत मशीदीबाहेर थांबले होते, असे सांगितले.
Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Loni Kalbhor Police Station – Three children run away from home as mother kills them; After four hours of trying, Sukhrup was found in the camp
हे देखील वाचा :
Harshad Dhage – Pune News | समाजसेवक ‘हर्षद ढगे’, ‘फॉर फ्यूचर इंडिया’ मार्फत करतोय पर्यावरणाचं रक्षण