Pune Crime News | गुन्हे शाखेकडून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला 48 तासात अटक, 4 लॅपटॉप जप्त

Pune Crime News | Pune crime branch arrested the house burglar in 48 hours, seized 4 laptops

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | लोखंडी पान्याच्या सहाय्याने ऑफिसचे दार तोडून ऑफिसमधील चार लॅपटॉप चोरून (Stealing Laptop) नेणाऱ्या चोरट्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट एकच्या (Unit-1) पथकाने 48 तासात अटक (Arrest) करुन गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime News) दारुवाला पुल चौकात करण्यात आली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

मंगेश विजय चव्हाण Mangesh Vijay Chavan (वय-26 रा. एस.एम.जोशी हॉल जवळ, दारुवाला पुल चौक, रास्ता पेठ) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. हा प्रकार 4 ऑगस्ट रोजी मॉडेल कॉलनी (Model Colony) येथे घडला होता. (Pune Crime News) दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपीच्या फोटोवरुन तपास करत असताना पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे (Datta Sonwane) यांना माहिती मिळाली की, सीसीटीव्ही मधील संशयित व्यक्ती सारखा दिसणारा एकजण दारुवाला पुल चौकातील (Daruwala Pool Chowk) सार्वजनिक शौचालयाजवळ थांबला आहे. पथकाने त्याठिकाणी जाऊन संशयीत आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली. आरोपीकडून 34 हजार रुपये किमतीचे चार लॅपटॉप जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला शिवाजनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokle),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 1 सुनिल तांबे
(ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Sr PI PI Shabbir Sayyad ),
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर (API Ashish Kawthekar), पोलीस उपनिरीक्षक रमेश तापकीर
(PSI Ramesh Tapkir), पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, निलेश साबळे, आण्णा माने, अमोल पवार, आय्याज दड्डीकर,
शंकर कुंभार यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime News | Pune crime branch arrested the house burglar in 48 hours, seized 4 laptops