राजगुरुनगर : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | कुख्यात गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर (Pappu Wadekar) (वय-28) याचा खून करण्यात आला आहे. पप्पू वाडेकर याने पुणे शहरात दहशत माजवली होती. पुणे जिल्ह्यातील (Pune district) राजगुरुनगरमधील (Rajgurunagar) एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याचा रागातून हा प्रकार घडला आहे. वाडेकरचा मालक मिलिंद जगदाळे व त्याच्या इतर पाच साथीदारांनी पप्पूचा काटा काढल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक सतिश गुरव (Police Inspector Satish Gurav) यांनी वर्तवला आहे. Murder of Notorious criminal Pappu Wadekar
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (दि.11) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पिस्तुलातून फायरिंग करत डोक्यात दगड टाकून पप्पू वाडेकरचा खून करण्यात आला. वाडेकर हा राजगुरुनगर शहरात येत असताना शहरालगत पाबळरोड येथे जुन्या गुन्हेगारी वादातून त्याचा खून करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलिस ठाण्यातील (Rajgurunagar Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामीण भागातील टोळीयुद्ध काही गुंडांच्या तडीपारीनंतर थांबले होते. परंतु या गुन्हेगारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. ग्रामीण भागात लहान वयातील गुन्हेगारी, टोळीयुद्ध संपवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) काही टोळी प्रमुखांना तडीपार केले होते. मात्र, त्यांच्या साथिदारांकडून एकमेकांना शह देण्याचे काम सुरुच राहिल्याने पप्पू वाडेकरचा खून झाला, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
web title: Pune Crime News | Notorious Tadipar goon Pappu Wadekar’s murder, a stir in Pune district.