बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | थेरगाव येथील एका रुग्णालयासमोर गांजा (Ganja Selling Racket) विक्रीसाठी आलेल्या दोघांना वाकड पोलिसांनी (Wakad Police) अटक केली. त्यांच्याकडून नऊ किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल विठ्ठल जाधव (वय २२, रा. गुलबर्गा, कर्नाटक), शालिवान आप्पाराव वाडी (वय ३२, रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप गवारी यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
थेरगाव येथील एका रुग्णालयासमोर दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. तेथे पोलिसांनी एक संशयित कार अडवली.
कारची झडती घेतली असता त्यात दोन लाख ३१ हजार ५०० रुपयांचा नऊ किलो ३०० ग्रॅम गांजा आढळून आला.
पोलिसांनी कारमधील राहुल आणि शालिवान या दोघांना अटक केली व मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गांजा
असा एकूण सात लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | nine kg ganja seized in pune pimpari and 2 arrested
हे देखील वाचा :
Pune Crime News | पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणार्या युवतीवर बलात्कार; दौंड येथील घटना, आरोपी अटकेत