Pune Crime News | मर्डरला मर्डरनेच देणार रिप्लाय; भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला, हडपसरमधील प्रकार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, बघ मर्डरला मर्डरनेच रिप्लाय देणार असे म्हणून गुंडांच्या टोळक्याने दोघांवर धारदार शस्त्राने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या घटनेत प्रदीप दिनकर देवकर Pradeep Dinkar Devakar (वय २२, रा. साडेसतरा नळी, हडपसर – Hadapsar News) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ओम ऊर्फ पिंटु भंडारी Om alias Pintu Bhandari (वय २३), सागर घायतडक Sagar Ghayatdak (वय १९), राजन लावंड Rajan Lavand (वय २२), मेघराज शितोळे Meghraj Shitole (सर्व रा. माळवाडी, हडपसर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार हडपसरमधील सरकारी ३२ नंबर शाळा येथे बुधवारी पहाटे दीड वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये अनिकेत शिवाजी घायतडक (Aniket Shivaji Ghayatdak)
याचा खून (Murder) झाला होता. त्यात शुभम भोंडे (Shubham Bhonde) हा आरोपी असून तो गेल्या तीन
वर्षापासून तुरुंगात होता. नुकताच तो जामीनावर सुटला आहे.
फिर्यादी प्रदीप देवकर हा त्याचा मित्र शुभम भोंडे याच्यासोबत सिगारेट ओढून रिक्षाने घरी जात होते.
त्यावेळी आरोपी हे दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादी व शुभम यांना रिक्षातून बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी
मारहाण (Beating) केली. तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डरनेच रिप्लाय देणार किंवा मला
५ लाख रुपये, आज तुला संपवूनच टाकणार असे म्हणून दोघांवर धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर व पाठीवर
वार करुन कोणी मध्ये आले तर आम्ही कोणालाही सोडणार नाही, असे बोलून दहशत निर्माण करुन
मोटारसायकलवरुन पळून गेले. तिघेही आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून सहायक पोलीस निरीक्षक डांगे (Assistant Police Inspector Dange) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Murder will be answered by murder; Fatal attack on youth on Bhar road, similar to Hadapsar
हे देखील वाचा :
Comments are closed.