पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | दुकानदाराला मला उधारीवर सामान देऊ नको असे का सांगितले, याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून बिल्डिंगच्या टेरेसवरुन ढकलून देत खून (Murder In Pune) केल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून हा प्रकार सोमवारी (दि.13) रात्री बाराच्या सुमारास वडगाव शेरी येथील संजय गांधी सोसायटीमध्ये घडला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बैजु लक्ष्मी मंडल Baiju Lakshmi Mandal (वय-35 रा. संजय गांधी सोसायटी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शंभु दपी राम (वय-47 रा. संजय गांधी सोसायटी, वडगाव शेरी) याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत मृत बैजु याचा मित्र संतोष कोंडीबा गिनलवाड (वय-32 रा. संजय गांधी सोसायटी, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती, फिर्य़ादी व आरोपी हे एकाच ठिकाणी राहतात. सोमवारी रात्री फिर्य़ादी यांचा मित्र बैजू आणि आरोपी शंभु यांच्यात वाद झाला. बैजू याने शंभू याला ‘मला उधारीवर माल देऊ नकोस असे दुकानदाराला का सांगितले’ याचा जाब विचारला. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून आरोपी शंभु राम याने बैजू मंडल याला जीवे मारण्याच्या उद्देशाने बिल्डिंगच्या टेरेसवरुन खाली ढकलून दिले. यामध्ये गंभीर जखमी होऊन बैजु याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन आरोपीला अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे (API Ghorpade) करीत आहेत.
- Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 55 वी स्थानबध्दतेची कारवाई
- ACB Trap News | लाच स्वीकारताना पोलीस हवालदार व झिरो पोलीस अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Low Blood Pressure | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!