पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | शहरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने महापालिकेचे उपायुक्त आणि शहर अभियंता यांना धमकी देणारे मेसेज ट्विटर अकाऊंटवर टाकण्यात आले.
याप्रकरणी शहर अभियंता प्रशांत वाघमारे (वय ५४) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार लिगल राईट ऑबझव्हेटरी एल आर ओ या ट्विटर अकाऊंट धारक
व वापरकर्ते यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी पुणे शहरातील अनाधिकृत बांधकामे, घरे,
झोपडपट्ट्या यांच्याविरुद्ध ठोस कारवाई केली आहे.
त्यामुळे त्यांची समाजात बदनामी व्हावी, या हेतूने ट्विटरवर पोस्ट करण्यात आली आहे.
त्यात बेकायदा कृत्य करणारी टोळी असून त्याचे नेतृत्व प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare) व
माधव जगताप (Madhav Jagtap) करतात. रोहिंग्या फेरीवाल्यांकडून पैसे घेऊन ते कारवाई करतात.
या दोघा गद्दारांची चौकशी करण्याची मागणी सीआयडी, इनकम टॅक्स,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे करणार असल्याचे त्यात म्हटले आहे.
Web Title :- Pune Crime News | Municipal Corporation City Engineer Prashant Waghmare, Deputy Commissioner Madhav Jagtap threatened for action against unauthorized constructions
हे देखील वाचा :