पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कोयते, तलवारी घेऊन लोकांना धाक दाखवत पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करत दहशत पसरविणार्या टोळक्यांचे प्रकार वाढले आहे. मार्केटयार्डामधील आंबेडकरनगर (Ambedkarnagar, Market Yard) येथे अल्पवयीन मुलांनी कोयते व तलवारी नाचवत मोटारसायकली व हातगाडीची तोडफोड केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी इस्माईल अयाज शेख (वय ३२, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२/२३) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकरनगरमधील सहा ते सात अल्पवयीन मुले गुरुवारी रात्री
दहा वाजता गल्ली नंबर १६ मध्ये कोयते व तलवारी नाचवत लोकांना दुकाने बंद करायला लावण्याची धमकी देत फिरत होते. त्यांनी लोकांच्या ७ मोटारसायकली व एका हातगाडीवर कोयत्याने व तलवारीने वार करुन त्यांचे नुकसान केले. लोकांमध्ये दहशत पसरवून ते निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Koyta gang’s rumble in the marketyard; Panic spread by damaging motorcycles, handcarts
हे देखील वाचा :
Nagpur Crime | नागपूर हादरलं! नराधमांनी महिलेच्या मृतदेहावर केले सामूहिक अत्याचार