पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | दुकानदाराला चाकूचा धाक दाखवून दर महिना 5 हजार रुपये हप्ता आणि दररोज एक क्वार्टर देण्याची मागणी करुन दारुची बाटली घेऊन जाणार्या गुंडाला पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुरज रोहिदास नलावडे Suraj Rohidas Nalavde (वय ३३, रा. गणेशनगर, शनी मारुती मंदिराजवळ, कोथरुड) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. यबाबत सतिश शंकरलाल मुलचंदानी (वय ४०, रा. वाकड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११२/२३) दिली आहे. हा प्रकर कर्वेरोडवरील कोहिनूर वाईन्समध्ये (Kohinoor Wines Karve Road) मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज नलावडे हा सराईत गुंड (Criminal On Pune Police Records) आहे. त्याच्यावर यापूर्वी ८ गुन्हे दाखल आहेत. दारुच्या दुकानदारांना खंडणी (Ransom Case) मागायची. दारुची बाटली, चकणा जबरदस्तीने घेऊन नदीपात्रात जाऊन दारु पित बसण्याची सवय आहे. (Pune Crime News)
फिर्यादी सतिश मुलचंदानी हे कर्वे रोडवरील कोहिनूर वाईन्स या दुकानात असताना मंगळवारी सायंकाळी सुरज त्यांच्याकडे आला.
फिर्यादी यांना दर महा ५ हजार रुपये हप्ता द्यायचा व रोज एक क्वार्टर दारु द्यायची अशी मागणी केली. त्याला फिर्यादीने नकार दिला.
तेव्हा त्यांना चाकूचा धाक दाखवून दुकान चालू देणार नाही, असे धमकावून एक आय बी कंपनीची दारूची बाटली जबरदस्तीने घेऊन गेला.
याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले (PSI Mahesh Bhosale) व त्यांच्या सहकार्यांनी सुरज नलावडे याचा
शोध घेतला. तेव्हा तो नदी पात्रात दारु पित बसला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Web Title : Pune Crime News | Knife-wielding inn hooligan who demanded installments from wine shop operator arrested; He was asking for a quarter every day