Pune Crime News | कल्याणीनगर : सिक्रेट पोलीस असल्याचे सांगत चोरट्याने मोबाईल घेऊन ठोकली धुम

Yerwada Police Station

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | रात्री फेरफटका मारत असलेल्या तरुणांना सिक्रेट पोलीस (Secret Police) असल्याचे सांगून तुम्ही मुलींचे व्हिडिओ काढल्याचे सांगत मोबाईल घेऊन चोरट्याने धुम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

याबाबत कल्याणीनगर येथील एका २१ वर्षाच्या तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६२२/२३) दिली आहे. हा प्रकार कल्याणीनगर येथील कुमार सिटी सोसायटीच्या (Kumar City Society Kalyaninagar) गेटजवळ रविवारी रात्री ९ वाजता घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मित्रांबरोबर जेवण केल्यानंतर फेरफटका मारत होते.
कुमार सिटी सोसायटीच्या गेटजवळ आले असताना एक जण मोटारसायकलवरुन आला.
त्याने सिक्रेट पोलीस असल्याचे सांगितले. “मै सिक्रेट पुलीस हू, उधर पिछे दो लडकी थी, तुम दोनोने उनके फोटो और
व्हिडिओ बनाये क्या?” असे बोलून त्याने दुरुन त्याचे ओळख पत्र दाखविले.
त्याने दोघांना मोबाईल फोनमधील गॅलरी अ‍ॅपलिकेशन ओपन करके दिखाओ, असे बोलला.
त्यानुसार त्यांनी दोघांनी मोबाईलमधील अ‍ॅपलिकेशनमधील फोटो व व्हिडिओ दाखविले.
त्याने समाधान न झाल्याने त्याने दोघांचे मोबाईल त्याच्याकडे घेऊन तो कल्याणीनगरच्या दिशेने बाईकवरुन निघून गेला. पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे (PSI Dombale) तपास करीत आहेत.