पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | दारु पित बसलेल्या पतीला विरोध केल्याच्या रागातून पतीने तिच दारुची बाटली पत्नीच्या डोक्यात मारुन तिला जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रदिप हिरेकरु (वय ३२, रा. विकासनगर, घोरपडी) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार विकासनगरमधील फिर्यादीच्या घरात १५ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजता घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पतीपत्नी आहेत. प्रदिप हिरेकरु याला दारुचे व्यसन आहे. मध्यरात्र उलटून गेली तरी प्रदिप घरात दारु पित बसला होता. तेव्हा त्यास फिर्यादी यांनी विरोध केला. फिर्यादी यांना घरातून कायमची हाकलून देतो, अशी धमकी देऊन प्रदिप याने लाथाबुक्क्यांनी मारुन दारुची रिकामी बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले. सहायक पोलीस उपनिरीक्षक सुतार तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | He injured his wife by hitting her on the head with the same bottle of alcohol as she refused to drink it
हे देखील वाचा :
Nagpur Crime News | चॉकलेटचे आमिष देऊन आरोपीकडून 7 वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार
Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना