Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना

Parbhani Crime News | two wheeler accident of a son who was going to meet his mother he died on the spot

परभणी : बहुजननामा ऑनलाईन  Parbhani Crime News | परभणीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आईला भेटण्यासाठी निघालेल्या मुलाचा दुचाकी अपघातात (Parbhani Accident News) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात परभणीच्या सेलू ते सतोना या रस्त्यावर घडला आहे. यामध्ये समोरासमोर दोन दुचाकींची धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामध्ये दुसऱ्या दुचाकीवरील पती-पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद या ठिकाणी हलवण्यात आले आहे. सचिन नारायण जोगदंड असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Parbhani Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरातील विकास नगर येथे राहणारे सचिन नारायण जोगदंड हे औरंगाबाद येथून आपल्या आईला भेटण्यासाठी परभणीकडे येत होते. यादरम्यान ते सेलू- सातोना रस्त्यावर आले असता समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये सचिन जोगदंड यांच्या छातीला दुचाकीचे हँडल लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेख उस्मान, शिवदास सूर्यवंशी, राहुल मोरे हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सचिन जोगदंड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. (Parbhani Crime News)

 

तर या अपघातात दुसऱ्या बाइकवरील पती-पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद या ठिकाणी हलवण्यात आले आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची नावे समजू शकलेली नाहीत. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सेलू पोलिसांनी सांगितले आहे.

 

मृताच्या भावाचाही अपघाती मृत्यू

मृत सचिन जोगदंड यांचे मोठे भाऊ विजय जोगदंड यांचादेखील काही वर्षांपूर्वी असाच अपघाती मृत्यू झाला होता. आता आईला भेटण्यासाठी येत असताना सचिन जोगदंड यांचा अपघाती मृत्यू झाल्याने जोगदंड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Parbhani Crime News | two wheeler accident of a son who was going to meet his mother he died on the spot

 

हे देखील वाचा :

Rajgad Fort | पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी, उल्लंघन केल्यास…

Pune Ola- Uber | ओला-उबेरला तात्पुरता परवाना बंद, आता लागणार पक्का परवाना