Pune Crime News | तत्कालीन मंत्र्यांचे नाव घेऊन नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक

Pune Crime News | Fraud by luring the job in the name of the then minister

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime News | भाजप – शिवसेनेच्या सरकारमध्ये (BJP – Shivsena Government) २०१९ मध्ये मंत्री असलेल्या बाळा भेगडे (Minister Bala Bhegade) यांचे नाव वापरुन पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा (Cheating Case) घातल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

भास्कर लक्ष्मण मोहोळ Bhaskar Laxman Mohol (वय ३८, रा. सदाशिव पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. मोहोळ याने आणखी काही जणांना फसविले असल्याची शक्यता आहे.

याबाबत शिवाजीनगर येथील एका ३६ वर्षाच्या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४५/२३) दिली आहे. हा प्रकार जून २०१९ ते नोव्हेबर २०२१ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका सीएच्या फर्ममध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. त्यांच्या मित्रांनी जून २०१९ मध्ये भास्कर मोहोळ हा सरकारी नोकरी मिळवून देण्याचे काम करतात, असे सांगितले. त्यांनी भास्कर मोहोळ याची भेट घेतल्यावर त्याने माझे कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे याच्याशी बोलणे झाले असून हे काम ते आपल्याला करुन देणार आहेत. त्याप्रमाणे मी तुम्हाला पीएमसीमध्ये नोकरी लावून देतो, त्यासाठी प्रत्येकी ५ लाख रुपये लागतील. त्यापैकी ४ लाख रुपये अ‍ॅडव्हान्स द्यावे लागतील़ व उर्वरित १ लाख रुपये काम झाल्यावर द्यावे लागतील. पैसै दिल्यानंतर १५ दिवसात काम करुन देतो, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांना २ लाख २० हजार रुपये दिले. (Pune Crime News)

त्यानंतर ते बरेच दिवस नोकरी बाबत काही सांगतील, म्हणून वाट पहात होते. त्यांना फोन केल्यावर काम होईल, थोडं थांबा असे बोलत होते. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या. तरी त्यांना नोकरी लावून दिली नाही. ज्या मित्रांनी भास्कर मोहोळ याची ज्यांनी ओळख करुन दिली होती, त्या मित्रांशी संपर्क साधल्यावर त्यांनाही भास्कर मोहोळ याने प्रत्येकी ४ लाख रुपये घेऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून बाळा भेगडे यांचे नाव वापरुन फसवणूक (Fraud Case) केलेली आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपले पैसे परत करावे, अशी मागणी केल्यावर मोहोळ थोड्या दिवसात देतो, असे सांगत होता. शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Fraud by luring the job in the name of the then minister