Parag Karandikar | अभिमानास्पद ! ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर (Parag Karandikar) यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संपादक या वर्गवारीतून ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’चे सदस्य बनणारे करंदीकर (Parag Karandikar) हे मराठी वृत्तपत्राचे दुसरे संपादक ठरले आहेत. यापूर्वी १९८० मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंद तळवलकर याच वर्गवारीतून सदस्य बनले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती होणे, ही पत्रकारांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद बाब समजली जाते. आतापर्यंत वेगवेगळ्या वर्गवारीतून आठ मराठी व्यक्ती ‘प्रेस कौन्सिल’च्या सदस्य बनल्या आहेत. वृत्तपत्राचे मालक या वर्गवारीतून यापूर्वी ‘सकाळ’चे संस्थापक नानासाहेब परुळेकर; तसेच ‘लोकमत’चे विजय दर्डा हे सदस्य नियुक्त झाले होते, तर ‘श्रमिक पत्रकार’ या वर्गवारीतून अनंत बागाईतकर आणि विजय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती. ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ या वर्गवारीतून ‘सकाळ’चे प्रतापराव पवार आणि राजीव साबडे यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता संपादक या वर्गवारीतून करंदीकर (Parag Karandikar) यांची नियुक्ती झाली आहे.
पराग करंदीकर हे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत आहेत. क्रीडा, राजकारण,
समाजकारण, संरक्षण अशा विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
Web Title : Parag Karandikar | Maharashtra Times Editor-in-Chief Parag Karandikar
Appointed as Member of Press Council of India
- Pune Crime News | ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
- Ganeshotsav 2023 | गणेशमंडळांना मोठा दिलासा! चार फुटांवरील पीओपीच्या गणेशमूर्तींना परवानगी
- Maharashtra State Election Commission | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
- Two Cops Suspended In Pune | पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्याकडून 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई
Comments are closed.