पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | अडचणीच्या वेळी १० टक्के व्याजाने पैसे घेतले होते (Money Lender in Pune). त्याचे पावणे दोन लाख व्याज दिल्यानंतरही गहाण ठेवलेला टेम्पो परत केला नाही. तसेच टेम्पो पाहिजे असल्यास आणखी २ लाख रुपयांची मागणी करुन मारहाण (Beating) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
यश संजय मेमाणे Yash Sanjay Memane (वय २६), मानव संजय मेमाणे Manav Sanjay Memane (वय २१, दोघे रा. रविवार पेठ) यांच्यावर खडक पोलिसांनी सावकरी कायद्याखाली (Moneylenders Act) गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका २२ वर्षाच्या व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) (गु. रजि. नं. २०९/२३) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)
फिर्यादी यांचा डेअरीचा व्यवसाय आहे. त्यांनी गरजेपोटी ४ नोव्हेबर २०११ रोजी यश मेमाणे याच्याकडून १ लाख ६० हजार रुपयांचे १० टक्के महिना व्याजाने पैसे घेतले होते. त्याने पहिल्या महिन्याचे व्याज कट करुन १ लाख ४४ हजार रुपये दिले. त्यासाठी त्याने फिर्यादी यांचा भागीदारीतील टेम्पो गहाण ठेवून घेतला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यानंतर त्यांनी आणखी ३० हजार रुपये घेतले. त्याचे त्यांनी १ लाख ७१ हजार रुपये व्याज दिले. त्यांनी गहाण ठेवलेला टेम्पो परत मागितला असता आणखी २ लाख रुपयांची अवाजवी मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने त्यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. आता घरी आलो तर काहीतरी घेऊन जाणार, असे म्हणून त्यांच्या हातातील स्मार्ट वॉच जबरदस्तीने काढून घेऊन गेले. पोलीस उपनिरीक्षक कुतवळ तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Even after repaying the money borrowed with excessive interest, he demanded another 2 lakhs and beat him up
- Pune Crime News | बॉयफ्रेंडशी मैत्री करण्यास नकार दिल्याने रुममेट मैत्रिणीने अर्धनग्न फोटो केले व्हायरल
- Sangli Crime News | सांगलीतील धक्कादायक घटना! विषप्राशन करुन नवविवाहीत पती-पत्नीची आत्महत्या
- Jalgaon Police Officer Dead In Accident | तपासाला जाताना गाडीवर कोसळले झाड; सहायक पोलिस निरीक्षकासह चालकाचा मृत्यु