पुणे : बहुजननामा ऑनलाईन – हडपसर (Hadapsar) ते स्वारगेट (Swargate) पीएमपी प्रवासात एका महिलेजवळील तबल दीड लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान प्रवासात होत असलेल्या चोऱ्या थांबत नसल्याचे दिसत आहे.
Pune Crime News | During the journey from Hadapsar to Swargate, the woman lost Rs 1.5 lakh
याप्रकरणी 53 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस (Swargate Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मूळच्या शिरूर तालुक्यातील न्हावरे गावच्या आहेत. त्यांचे गावात दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी त्या खरेदी करण्यासाठी पुण्यात आल्या होत्या.
त्या हडपसर परिसरातून पीएमपी बसमध्ये बसल्या आणि स्वारगेट परिसरात उतरल्या. यादरम्यानच्या प्रवासात चोरट्याने त्यांच्याकडील पिशवीची चेन उघडून दीड लाखांची रोकड चोरली. स्वारगेट येथे आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांनी त्यांच्या पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक अविनाश लोहोटे करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
Ministry of Indian Railways। प्रवाशांसाठी 50 स्पेशल ट्रेन सुरु होणार, रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय
Pune Crime News | अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या सराईताला विश्रामबाग पोलिसांकडून अटक
Pune News | ‘कोरोना’चा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
Pune Crime News | कोयते घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक