Pune Crime News | मौजमजा करण्यासाठी नागरिकांची फसवणूक, गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक; 43 लाखांची 7 वाहने जप्त
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | मौजमजा करण्यासाठी लोकांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या भामट्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने (Pune Police Crime Branch Unit-3) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून 43 लाख रुपये किमतीची 7 वाहने जप्त केली आहेत. सयाजी ज्ञानदेव पाटील Sayaji Gyandev Patil (वय-35 रा. तातोबा कॉम्पलेक्स, मानाजीनगर, नऱ्हे, पुणे मुळ रा. अमनापुर ता. पलूस, जि. सांगली ) असे अटक केलेल्या (Pune Crime News) आरोपीचे नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सयाजी पाटील याने इर्टीका कार Ertiga Car (एमएच 12 एनपी 1637) शिरवळ येथील कंपनीत महिना 50 हजार रुपये भाडे तत्वावर लावून देण्याचे सांगून कार मालकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कार घेऊन जाऊन कार मालकाला कोणताही परतावा दिला नाही. तसेच कार परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) कार मालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 406, 420 गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास युनिट तीनेच पोलीस निरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar) करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चत्ते यांना नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी सयाजी पाटील याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने मौज मजेसाठी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 43 लाख 50 हजार रुपये किमतीची सात वाहने जप्त केली आहेत.
आरोपीकडून जप्त केलेली वाहने
1 . रामेश्वर दामोदर शेळके (रा. यशोदिप चौक, वारजे माळवाडी) यांची 7 लाख रुपये कंपनीची डिझायर कार (एमएच 12 केएन 8545)
2 . रविंद्र जनार्धन जाधव (रा. पौर्णिमा हाईट्सजवळ, नऱ्हे) यांची 4 लाख रुपये किंमतीची फोर्ड कंपनीची फियस्टा (एमएच 12 डिएस 5220)
3 . शशीकांत अमृत बरगे (रा. मु. पांढरवाडी, पो. डिकसळ ता. खटाव, जि. सातारा) यांची 9 लाख रुपये किंमतीची इर्टिका (एमएच 11 डिए 0684)
4 . बाबु शंकर राठोड (वय-45 रा. गणेश नागर, बोपखेल) यांची 6 लाख रुपये किंमतीची इर्टिका कार (एमएच 14 केएफ 0430)
5 . विभुते यांची 7 लाख रुपये किंमतीची स्विफ्ट कार (एमएच 45 ऐसी 7987)
6 . गणेश सोपान धोत्रे (रा. धायरीगाव) यांची 5 लाख रुपये किंमतीची वॅगनआर कार (एमएच 12 एनपी 1637)
7 . दाखल गुन्ह्यातील तक्रारदार यांची 5 लाख 50 हजार रुपये किमतीची इर्टिका कार जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे
(ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, (Senior PI Srihari Bahirat),
पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील (PSI Ajit Kumar Patil), राहुल पवार, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर,
राजेंद्र मारणे, शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार, संजिव कळंबे, सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते, सतीश कत्राळे,
प्रकाश कटटे, साईनाथ पाटील प्रताप पडवाळ, साईनाथ कारके, गणेश शिंदे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.
Comments are closed.