पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | कौटुंबिक वादातून महिलेवर पतीने चाकुने वार केल्याची घटना खराडी भागात घडली. महिलेचा खून (Murder in Pune) करुन पती स्वत:च चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) हजर झाला. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लक्ष्मी केशव सीताफळे (वय ४०, रा. लेबर कॅम्प, पाटीलबुवानगर, खराडी) असे खून (Pune Murder News) झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीचा पती केशव भीमराव सीताफळे (वय ४५) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी आणि पती केशव यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले होते. केशवने पत्नीला शिवीगाळ करुन तिचा गळा चाकुने चिरला. पत्नीचा खून करुन तो पोलीस ठाण्यात हजर झाला. खूनामागचे निश्चित कारण समजले नसून, प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून पतीने तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
- ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचा चोरट्यांचा नवा फंडा! मीठी मारून रोकड केली लंपास; सदाशिव पेठेतील घटना
- ACB Trap News | लाचेची रक्कम घेऊन पळून जाताना पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Business Idea | 3000 रुपये लावून श्रीमंत बनण्याची संधी! ‘या’ बिझनेसमधून करू शकता लाखोंची कमाई
- New Passport Rules | नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणे झाले सोपे! घरी बसून करता येणार अर्ज
- Income Tax Refund लवकर मिळवण्यासाठी आवश्य करा ‘हे’ उपाय, अन्यथा होईल विलंब
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट ! सरकार ‘या’ दिवशी करणार DA वाढीची घोषणा!