पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | एका नोकरदाराचा सायबर चोरट्यांनी (Cyber Thief) आय डी व पासवर्ड घेऊन त्यांच्या ई व्हायलेटमधून (E Violet) पैसे काढून घेतले होते. त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने संबंधित कंपनीने सर्व पैसे गोठविले. त्यामुळे सायबर चोरट्यांना हाती केवळ दीड हजार रुपये लागले. गोल्डन अवरमध्ये तक्रार केल्याने फसवणुक (Cheating Case) झाल्यानंतरही पैसे परत मिळविणे शक्य झाले. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत एका खासगी कंपनीत नोकरी करणार्या नोकरदाराने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) तक्रार केली होती. सायबर चोरट्यांनी तक्रारदार यांना फोन केला होता. आपण कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तक्रारदार यांच्या मोबीविकच्या ई वॉलेटचा आयडी व पासवर्ड काढून घेतला होता. त्यानंतर त्यांच्या ई वॉलेटमधील ६० हजार रुपये काढून घेतले होते. त्यांनी तातडीने कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस शिपाई शेलार यांनी हे लक्षात घेऊन तातडीने कंपनीला ई मेल करुन तक्रार केली. तसेच फोन करुन माहिती दिली. सायबर चोरट्यांनी त्यांच्या ई वॉलेटमधून काढलेल्या ६० हजार रुपयांपैकी दीड हजार रुपये दुसरीकडे वळविले होते.ते वगळता उरलेले ५८ हजार ५०० रुपये कंपनीने तातडीने गोठवले व ते पुन्हा तक्रारदार यांच्या ई वॉलेटमध्ये वळते केले. कंपनीचे तसे पत्र पोलिसांना नुकतेच प्राप्त झाले आहे. (Pune Crime News)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior Police Inspector Santosh Sonwane),
पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Police Inspector Sandeep Bhosale), संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शेलार यांनी ही कामगिरी केली.
- Pune Crime News | चंदननगर: कौटुंबिक वादातून विवाहितेचा खून; पती पोलीस ठाण्यात हजर
- ACB Trap News | लाचेची रक्कम घेऊन पळून जाताना पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- New Passport Rules | नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणे झाले सोपे! घरी बसून करता येणार अर्ज
- Business Idea | 3000 रुपये लावून श्रीमंत बनण्याची संधी! ‘या’ बिझनेसमधून करू शकता लाखोंची कमाई
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट ! सरकार ‘या’ दिवशी करणार DA वाढीची घोषणा!