Pune Crime News | चंदननगर पोलिस स्टेशन – जीवनसाथी निवडताना दोघींची 23 लाखांची फसवणूक; नायजेरियन फ्रॉडमध्ये अडकल्या अन् फसल्या
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | जीवनसाथी डॉट कॉम (Jeevansaathi Website) या वेबसाईटवर ओळख झालेल्या तरुणाने परदेशातून मौल्यवान वस्तू गिफ्ट म्हणून पाठवत असल्याचे भासवून दोघा तरुणींना २२ लाख ८३ हजार ९६९ रुपयांना गंडा (Cheating Case) घातला. (Pune Crime News)
याप्रकरणी एका २९ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात Chandannagar Police Station (गु. रजि. नं. २५४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयटी अॅक्टखाली गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
फिर्यादी यांची जीवनसाथी डॉट कॉम वर विराट पटेल याची ओळख झाली होती.
पटेल याने त्यांना लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखविले. आपण परदेशात काम करीत असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्याने मौल्यवान वस्तू गिफ्ट (Gift Items) पाठवत असल्याचे सांगितले.
त्यानंतर या तरुणीला दिल्ली एअरपोर्टवर (Delhi Airport) हे गिफ्ट कस्टमने अडविले असल्याचे सांगण्यात आले.
इम्पोर्ट चार्जेस (Import charges) म्हणून त्यांच्याकडे सुरवातीला ३२ हजार ९०० रुपये मागितले.
त्यानंतर इन्कम टॅक्स (Income Tax), डिलिव्हरी टॅक्स चार्ज (Delivery Tax Charged) अशी वेगवेगळी
कारणे सांगून तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. तसेच विराट पटेल याने आपल्याला चेक इंडियन रुपीमध्ये कन्व्हर्ट करुन घेण्यासाठी पैसे हवे असल्याचे सांगून तिच्याकडून आणखी पैसे मागितले. अशा प्रकारे तिने १३ लाख ५३ हजार ९६९ रुपये भरल्यानंतर एअरपोर्टवरील व्यक्ती तिला आणखी पैसे भरावे लागतील, असे सांगत राहिला. तेव्हा तिने हा प्रकार आपल्या नातेवाईक तसेच वकिलाला सांगितला. त्यांच्याकडून असे प्रकार एअरपोर्टवर घडत नाही, असे त्यांनी सांगितल्यावर तिला आपली फसवणूक (Fraud Case) झाल्याचे लक्षात आले.
अशाच प्रकारे खराडी येथे राहणार्या आणखी एका तरुणीला ९ लाख ३० हजार रुपयांना फसविण्यात आले असल्याचे समोर आले आहे. चंदननगर पोलीस तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | CHANDANAGAR POLICE STATION – 23 lakh fraud of both while choosing life partner; Nigerians caught in fraud And cheated
Comments are closed.