पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पैशासाठी पत्नीला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय (Prostitute Business) करण्यास लावण्याचा व ३ हजार रुपयांसाठी मित्रांच्या हवाली करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी एका २५ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५२५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पतीसह आदित्य गौतम Aditya Gautam (रा.कसबा पेठ), सुजित पुजारी Sujith Pujari (रा. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार हांडेवाडी रोडवर डिसेंबर २०२० पासून मे २०२२ दरम्यान होत होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने फिर्यादी यांना मारहाण (Beating) करुन उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करुन वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले.
तसेच त्यांच्या दोन मित्रांकडून प्रत्येकी ३ हजार रुपये घेऊन त्यांच्याबरोबर शरीरसंबंध करण्यास भाग पाडले. (Pune Crime News)
दरम्यान काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिला रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवला.
तिला जातीवाचक शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली.
या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिली.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai) तपास करत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Bargained wife for money; Handed over to friends for Rs 3,000: Forced wife to engage in prostitution
हे देखील वाचा :
Pune ACB Trap | पुरंदर : लाच प्रकरणी महिला तलाठयासह दोघांना अॅन्टी करप्शनकडून अटक
Pune Accident News | कचर्याच्या गाडीच्या धडकेने ३ वर्षाची चिमुरडी ठार