पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | मोटारसायकलचा कट बसल्याच्या रागातून युवकाच्या खुनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री हडपसर परिसरातील इंदिरानगर वसाहतीमधील म्हाडा कॉलनीतील सार्वजनिक रस्त्यावर घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रोहित गायकवाड आणि अंबाजी शिंगे (दो. रा. गोसावी वस्ती, हडपसर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
यासंदर्भात अरफात रज्जाक लब्बै (23, रा. 12 ए नं गल्ली, सय्यद नगर, महमदवाडी रोड, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. अरफात हे मंगळवारी त्यांच्या पाहुण्यांकडे जात असताना गोसावी वस्ती या ठिकाणी त्यांच्या मोटारसायकलचा रोहित गायकवाडला कट बसला. (Pune Crime News)
मंगळवारी मध्यरात्री अरफात हे मित्र शाहरूखला भेटण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री इंदिरानगर वसाहत येथे
रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी रोहित गायकवाडने त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा
प्रयत्न (Attempt To Murder) केला. आरोपी अंबाजी शिंगेने शाहरूखला हाताने मारले.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डांगे करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Attempted murder out of anger over motorcycle conspiracy, incident in Hadapsar area
हे देखील वाचा :
Mhada Lottery 2023 | आता म्हाडाचे घर घेणं झालं सोप्प! २१ नाही तर लागणार फक्त एवढीचं कागदपत्रे…
Hypersomnia Symptoms | ८ तास झोपल्यानंतर सुद्धा दिवसा का येते झोप, जांभईपासून अशी होईल सुटका
Jitendra Awhad | सीएम नाहीत व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत, जितेंद्र आव्हाडांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
Amla Benefits | आवळ्याच्या पाण्याने कमी होतो लठ्ठपणा, डोळ्यांची दृष्टी सुद्धा सुधारते