पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | मोटारसायकल हळू चालव, असे सांगितल्याच्या कारणावरुन दोन गुंडांच्या टोळ्यांनी मार्केटयार्डमधील (Market Yard) आंबेडकरनगरमध्ये भरदिवसा हैदोस घातला. एकमेकांवर तलवार, कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. मार्केटयार्ड पोलिसांनी दोन्ही गटातील मिळून ८ जणांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अनिलसिंग ऊर्फ बु सिंकदरसिंग टाक (वय २१, रा. गल्ली नं. १ आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याने मार्केटयार्ड पोलिसांकडे (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दत्ता भिसे (वय २९), नितीन भिसे (वय १९), विजय भिसे (वय २४) यांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी ११ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टाक व आरोपी हे एकाच परिसरात रहायला आहेत. दत्ता भिसे याचा पुतण्या आकाश भिसे हा फिर्यादीच्या घरासमोरुन भरधाव वेगाने मोटारसायकल घेऊन जात होता. त्यावेळी त्यांनी त्याला मोटारसायकल हळू चालवत नेत जा असे सांगितले. याचा राग मनात धरुन दत्ता भिसे व इतर ८ जण हातात कोयते व काठ्या घेऊन आले. त्यांनी फिर्यादीवर कोयत्याने व काठीने मारहाण (Beating) करुन दहशत निर्माण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करीत आहेत. (Pune Crime News)
याविरोधात दत्ता महादेव भिसे (वय ३९, रा. गल्ली नं. ११, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याने मार्केटयार्ड पोलीस
ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २०/२३) दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी पिटुसिंग दुधानी (वय ३८),
अनिलसिंग सिकंदरसिंग टाक (वय २१), सिकंदरसिंग राजुसिंग टाक (वय ४०), रोहित दुधानी (वय १९) यांना
अटक केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिर्यादी यांचा पुतण्या आकाश भिसे याला आरोपीने घरासमोरुन वेगाने मोटारसायकल नेल्याच्या कारणावरुन मारहाण
केली होती. त्याबाबत आकाश हा त्याच्या वडिलासोबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात जात होता.
फिर्यादी हे त्यांच्या घरासमोरुन जात असल्याचे पाहून अनिलसिंग टाक याने शिवीगाळ करुन तलवारीने हल्ला
करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरामध्ये तलवार नाचवून व काठ्या फिरवून लोकांमध्ये दहशत
निर्माण केली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Ambedkar Nagar in Market Yard, two gangs of gangsters ran amok; 8 people from both the groups were arrested for fighting each other, attacking each other with swords
हे देखील वाचा :
Pune Crime News | मांज्यामुळे हॉटेल व्यवसायिकाचा कापला गेला गळा; वारजे येथील घटना