Pune Crime News | गुन्हे शाखेच्या युनिट-3 कडून 2 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई, सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलासह 2 राऊंड जप्त

Pune Police Crime Branch

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट-3 ने दोन तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली असून एका सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलासह 2 राऊंड जप्त केले आहेत. अक्षय आनंदा चौधरी (25, रा. मु.पो. नांदोशी, ता. हवेली, जि. पुणे) याला कॅनोल रोडवरील हॉटेल विदर्भ समोरून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून लोखंडी पिस्तुल आणि 2 जिवंत राऊंड असा एकुण 41 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

आरोपी अक्षय चौधरी याच्याबद्दल सहाय्यक पोलिस फौजदार संतोष क्षीरसागर यांना माहिती मिळाली होती. त्यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी अक्षय चौधरी याच्याविरूध्द खुन, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत. (Pune Crime News)

झोन-4 च्या पोलिस उपायुक्तांनी तडीपार केलेले लोणीकंद पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (23, रा. गाडेवस्ती, बकोरी फाटा, बी.जे.एस. कॉलेज, शेजारी, वाघोली, पुणे) आणि विशाल उर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी (22, रा. मु.पो. बकोरी फाटा, रामचंद्र कॉलेजजवळ, वाघोली, पुणे) यांना युनिट-3 च्या पोलिसांनी पकडून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 142 प्रमाणे कारवाई केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे (ACP Sunil Tambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat),
पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील (PSI Ajitkumar Patil), पोलिस अंमलदार संतोष क्षीरसागर, शरद वाकसे,
किरण पवार, संजिव कळंबे, सोनम नेवसे, सुजीत पवार, राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, साईनाथ पाटील, साईनाथ कारके,
ज्ञानेश्वर चित्ते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस फौजदार संतोष क्षीरसागर करीत आहेत.

Satara Dhom Dava Kalwa | धोम डावा कालवा फुटला, मध्यरात्री ओढ्याला पुर आल्याने ऊसतोड मजुरांचे संसार वाहून गेले