पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | ४३ वर्षाचा बाप पण बेकार, दारुच्या नशेत राहतो. त्याच्या मुलाच्या अकरावीच्या अॅडमिशनसाठी त्याने आपल्या ६४ वर्षाच्या आईकडे पैसे मागितले. तिने वडिलांकडून घे असे सांगितल्याने रागाच्या भरात आपल्याच आईच्या डोक्यात सळईने मारहाण (Beating) करुन तिला गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बलविंदर कौर सरबतसिंग सिदधू (वय ६४, रा. भंगार गल्ली, नागपूर चाळ, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हरजितसिंग ऊर्फ सोनू सरबतसिंग सिदधू Harjit Singh alias Sonu Sarbat Singh Siddhu (वय ४५) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा हरजितसिंग हा काहीही काम धंदा करत नाही.
दारु पित असतो आणि पैशांची मागणी करत असतो. दारु पिण्यासाठी त्याने त्यांच्या घरातील किंमती वस्तू विकल्या आहेत़.
त्याला १९ व १६ वर्षाची दोन मुले आहेत. फिर्यादी या बुधवारी दुपारी घरी होत्या. त्यांचा दुसरा नातू हा अकराव अकरावीमध्ये गेला आहे. हरजित सिंग हा त्याच्या अॅडमिशनसाठी फिर्यादीकडे पैसे मागू लागला.
तेव्हा त्यांनी तुझ्या वडिलांकडून घे, असे सांगितले. त्यावर त्याने चिडून फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी सळई मारुन गंभीर जखमी केले. तेव्हा फिर्यादी यांची ८० वर्षांची आई मध्ये पडली असता तिला त्याने हाताने ढकलून दिले. जखमी झालेल्या फिर्यादीला नातेवाईकांनी ससून रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्यांच्या डोक्याचे सिटी स्कॅन, एक्स रे, एम आर सोनोग्राफी टेस्ट करण्यात आल्या. येरवडा पोलीस तपास करीत आहेत.