पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | विवाहित महिलेचा पाठलाग करुन विनयभंग (Molestation Case) केला. तसेच पतीला व घरच्यांना मारुन टाकून पळवुन नेण्याची धमकी दिल्याची घटना शिवाजीनगर परिसरात घडली आहे. हा प्रकार 2022 ते सोमवार (दि.27) या दरम्यान पाटील इस्टेट व पीडित महिलेच्या घरासमोर वारंवार घडला आहे. याप्रकरणी एका तरुणावर खडकी पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 26 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी जावेद इराणी (वय-24 रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहात. फिर्यादी यांचे लग्न झाल्याचे माहित असताना देखील आरोपी जावेद इराणी याने मागिल एक वर्षापासून महिलेचा वेळोवेळी पाठलाग केला. तसेच रस्त्यात गाठून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत फिर्यादी यांचा हात पकडून विनयभंग केला. (Pune Crime News)
आरोपीने मी तुझ्याशीच लगन करणार असे म्हणाल्याने फिर्यादी महिलेने त्याला कानशिलात लगावली.
यानंतर जावेद इराणी याने फिर्यादी यांच्या पतीसमोर लग्न केले नाही तर मी तुझ्या पतीला तुझ्या घरच्यांना मारून टाकीन.
तसेच तुला पळवून नेऊन लग्न करेन अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेंदगुडे (PSI Bendgude) करीत आहेत.
- Pune Crime News | मुलाला टिळा लावते, मुस्लिम मुलीप्रमाणे स्वयंपाक येत नाही म्हणून कौटुंबिक अत्याचार, पतीला अटक; कोंढवा परिसरातील घटना
- Side Effects Of Banana With Milk | ‘या’ लोकांनी एकत्र केळी आणि दूध खाऊ नये, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार
- Brain Health | हिवाळ्यात मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ, होईल अत्यंत फायदा…
- पिवळीची पांढरी गाडी करण्यासाठी आरटीओ एजंटकडून साडेसात लाखाची फसवणूक