Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन मानसिक छळ, 30 वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल; कोथरुड परिसरातील घटना
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा (Pune Minor Girl) पाठलाग करुन तिचा मानसिक छळ करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना कोथरुड परिसरात घडली आहे. याप्रकरणी 30 वर्षीय नराधमाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर ते डिसेंबर 2023 या कलावधीत कोथरुड (Pune Police) परिसरात घडला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) मंगळवारी फिर्याद दिली आहे. यावरुन अक्षय पासुटे (वय-30 रा. हनुमाननगर, कोथरुड) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 354अ, 504, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 12 वर्षाच्या मुलीचा वारंवार पाठलाग केला. तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तु खुप आवडते, त्यामुळे तु मला सोडून तुझ्या आजीकडे जाऊन नको, असे म्हणत तिचा हात पकडून विनयभंग केला. (Pune Crime News)
तसेच फिर्यादी यांची मुलगी शाळेत जात असताना आरोपी अक्षय पासुटे याने तिचा पाठलाग केला.
ती मैत्रिणींसोबत खेळण्यासाठी गेली असता त्याने तिचे दफ्तर ओढणे, डोक्याचे केस ओढून तिची छेड काढली.
मोठ मोठ्याने आय लव्ह यू म्हणत तिला मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याबात फिर्यादी यांना समजले असता त्यांनी नातेवाईकांशी चर्चा करुन मंगळवारी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काटकर (PSI Katkar) करीत आहेत.
- डर्टी पिक्चर ! पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार, वाघोली परिसरातील घटना
- चेष्टा मस्करीत गुदद्वाराला पाईप लावून गुदद्वारातून शरीरात भरली हवा, अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू; हडपसर परिसरातील घटना
- धक्कादायक! नाना पेठेत तरुणीला भररस्त्यात मारहाण
- पुण्यातील वाकडा पुल येथील खुनाच्या प्रयत्नातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता
- रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात
Comments are closed.