खेड शिवापुर : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुणे-सातारा रोडवरील (Pune-Satara Road) सोनल वाईन्स (Sonal Wines) या मद्य विक्रीच्या दुकानात दिवसभर जमा झालेली रक्कम घेऊन जात असताना तीन चोरट्यांनी गोळीबार (Firing) करुन लुटून (Looted) नेली. हा प्रकार रविवारी (दि.19) रात्री पावणेबाराच्या सुमारास खेड शिवापूर (Khed Shivapur) येथे घडला. या घटनेत (Pune Crime News) चोरट्यांनी 3 लाख 78 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्यातील (Rajgad Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर हद्दीमध्ये सोनल वाईन्स नावाचे दुकान आहे. हे दुकान बंद करुन दीपक शंकर जगदाळे (रा.गराडे ता. पुरंदर) आणि कालेश्वर अगारिया हे दोघे जण दिवसभर जमलेली 3 लाख 78 हजार रुपयांची रक्कम पिशवीत ठेवून शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होते. त्यावेळी मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यानंतर चोरट्यांनी पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावळी कालेश्वर याने चोरट्यांना विरोध केला असता त्यांनी पिस्तूल काढून दोन वेळा गोळीबार करुन पैशांची पिशवी घेऊन पसार झाले.
या घटनेबाबत राजगड पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक सचिन पाटील (Police Inspector Sachin Patil) यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे (Assistant Police Inspector Manoj Kumar Navsare) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | 3 lakh 78 thousand looted by shooting incident at village shivapur
हे देखील वाचा :
Latika Gorhe Passed Away | विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक
Uddhav Thackeray | ‘… तर 2024 ची निवडणूक शेवटची ठरु शकते’, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान (व्हिडिओ)