पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पेईंग गेस्ट (Paying Guest) म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनियर (IT Engineer) तरुणी शॉर्ट (Shorts) घालून फिरत असल्याच्या कारणावरुन शेजारी राहणाऱ्या महिलिने तरुणींना चपलेने मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.2) रक्षकनगर (Rakshak Nagar) मध्ये घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षकनगर परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्याकडे तीन तरुणी पेईंग गेस्ट म्हणून राहतात. आयटी इंजिनिअर असलेल्या या मुली खराडी (Kharadi) येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. दरम्यान या तरुणी अधून – मधून शॉर्ट घालून घराबाहेर जातात. या मुली शॉर्ट घालतात हे फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्यांना खटकत होते. याबाबत शेजाऱ्यांनी फिर्यादी यांच्याकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी काय घालावे आणि काय नाही हा त्यांचा प्रश्न असल्याचे उत्तर फिर्यादी यांनी शेजाऱ्यांना दिले. (Pune Crime)
याच कारणावरुन शेजारी राहणाऱ्या एका 55 वर्षीय महिलेने फिर्यादी यांच्या घरात घुसून वााईट भाषेत शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण केली. एवढेच नाही तर शॉर्ट घालून बाहेर जाणाऱ्या मुलींना देखील चपलेने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे (API Sonavane) करत आहेत.
Web Title :- Pune Crime | neighbors beat up young woman it engineers for walking around the house wearing shorts FIR on 6 in chandan nagar police station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
World Obesity Day | वजन कमी करायचे आहे तर चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, खाल्ल्यास वाढू शकतो लठ्ठपणा