Pune Crime | NDA त लष्करी अधिकारी असल्याचे भासविणारा तोतया पोलिसांच्या जाळ्यात; इव्हेंट मॅनेजमेंट करणार्याने लष्करी गणवेश घालून केला फसवणुकीचा प्रयत्न
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत असताना त्याने NDA मध्ये लष्करी अधिकारी असल्याचे दर्शविणारे लष्करी गणवेशात असलेले फोटो Facebook वर टाकून फसवणुकीचा प्रयत्न केला. आर्मी इंटेलिजन्स ब्युरोच्या (Intelligence Bureau) नजरेतून तो सुटू शकला नाही. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक केली. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रफिक हरुन जमादार (वय३२, रा. शुभारंभ कॉलनी, संतोषनगर, कात्रज) असे या तोतयाचे नाव आहे. त्याच्याकडून आर्मी वर्दीचे दोन शर्ट पॅन्ट, १ टोपी, १ बेल्ट, आर्मीचे कागदी लोगो, २ परेड पासेस, १ कलावंत ढोल ताशा पथकाचे आयकार्ड अशा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत खंडणी विरोधी पथकातील (Anti Extortion Cell Pune) पोलीस नाईक राजेंद्र लांडगे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६०२/२२) दिली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मी मिलटरी इंटेलिजन्स ब्युरोला एक तोतया आर्मीमध्ये असलेल्याची
बतावणी करुन आर्मीचा गणवेश, ओळखचिन्ह जवळ बाळगून तोतयागिरी करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी ही माहिती गुन्हे शाखेला (Pune Police Crime Branch) पुरविली.
त्यानुसार आर्मी मिलटरी इंटेलिजन्स ब्युरोचे (Military Intelligence Bureau) कर्मचारी आणि गुन्हे शाखेचे पथक यांनी संतोषनगरमधील रफिक जमादार याच्या घरी छापा घातला.
त्यात लष्करी गणवेश व बनावट कागदपत्रे आढळून आली.
त्याच्या फेसबुकवर त्याने राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी, एनडीएमध्ये काम करीत असल्याचे व एनडीएमधील फोटो तसेच
लष्करी गणवेशातील फोटो अपलोड केल्याचे आढळून आले.
हा प्रकार त्याने का केला, त्याची तो माहिती देत नसून त्याने लष्करी अधिकारी असल्याचे भासवून कोणाची फसवणूक
केली आहे का याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | NDA impersonates army officer in police net; The event management tried to cheat by wearing military uniform
हे देखील वाचा :
Pune Crime | पैसे परत करण्याचा तगादा लावणार्या 7 जणांवर गुन्हा दाखल, पुण्यातील 4 सावकारांना अटक
HSC – SSC Exam 2023 | दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा
Comments are closed.