पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | भावासोबत पत्नीचे अनैतिक संबंध (immoral relationship) असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा धारदार चाकू पोटात खुपसून खून (Pune Crime) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) वाघोली गावच्या हद्दीतील लेबर कॅम्पमध्ये (labor camp) सोमवारी (दि.23) पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) पतीविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक (Arrest) केली आहे.
अनू रजू मिर्झा Anu Raju Mirza (वय-28 रा. बी.जे.एस. कॉलेज समोर, मॅजेस्टिक सोसायटी लेबर कॅम्प, वाघोली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. राजु पुनाराम मिर्झा Raju Mirza (वय-30 रा. कांचन हॉटले, खांदवेनगर, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नवा आहे. तर राजेश पुनाराम मिर्झा (वय-22 रा. कांचन हॉटले, खांदवेनगर, वाघोली) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू मिर्झा हा मुळचा छत्तीसगडचा (Chhattisgarh) रहिवासी आहे. तो आणि त्याची पत्नी मोशी येथील एका बांधकामावर मजुरी करतात. त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा पत्नीकडे तर दुसरा मुलगा गावी आहे. राजूला दारुचे व्यसन असून तो दारु पिऊन पत्नीला मारहाण करत होता. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते.
दोन-तीन महिन्यापूर्वी राजूची पत्नी अनू ही आपल्या मुलाला घेऊन गावी जात असल्याचे सांगून
फिर्यादी राजूचा भाऊ राजेश याच्याकडे येऊन राहत होती. पत्नी गावी न जाता भावाकडे जाऊन
राहत असल्याची माहीती आरोपीला दोन तीन दिवसांपूर्वी समजली. त्याने पत्नी राहात असलेल्या वाघोली (Wagholi) येथील लेबर कॅम्पमध्ये आला. त्याने पत्नीकडे मुलाची मागणी केली. परंतु पत्नीने मुलाला देण्यास नकार दिला.
सोमवारी पहाटे आरोपी लेबर कॅम्पमध्ये आला. त्यावेळी अनू पत्र्याच्या खोलीत झोपली होती. त्याने
दरवाजा वाजवून तिला बाहेर बोलावून घेतले. तू माझ्या भावाशी सारखी बोलते, असा संशय घेऊन
त्याने सोबत आणलेला धारदार चाकू तिच्या पोटात खुपसला. यामध्ये गंभीर जखमी होऊन अनूचा
मृत्यू झाला. आरोपीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन लोणीकंद पोलिसांनी आरोपी राजु विरोधात
गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) तटकरे (Police Inspector (Crime) Tatkare) करीत आहेत.
web title: Pune Crime | Murder of wife in Pune on suspicion of immoral relationship, commotion in the area.
आता WhatsApp द्वारे बुक करू शकता कोविड व्हॅक्सीनेशनचा स्लॉट, जाणून घ्या सोपी पद्धत
Pune News | पुण्यातील शिवसैनिक आक्रमक; भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या