पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | घरगुती कारणावरुन पत्नीने बहिणीच्या पतीशी संगनमत करुन पतीचा गळा आवळून त्याचा खून (Murder in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) दोघांना अटक केली आहे. (Pune Crime)
गजेंदर चित्तरसिंग नायक (वय ३६) आणि अंजली कप्तानसिंग चव्हाण ऊर्फ नायक (वय ३२, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कप्तानसिंग नायक (वय ३७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कप्तानसिंग नायक हा बिगारी काम करीत होता. केशवनगर (Keshav Nagar, Mundhwa) येथील गुरुकृपा सोसायटीत ते रहातात. कप्तानसिंग हा मुळचा दिल्लीचा आहे.
तर त्याची पत्नी अंजली ही मुळची सोलापूर (Solapur) येथील राहणारी आहे. कप्तानसिंग याला दारुचे व्यसन होते. तो सतत दारु पिऊन पत्नीला मारहाण करीत असत. शनिवारी रात्री तो दारु पिऊन आला. त्याने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून तिने साडुच्या मदतीने रविवारी दुपारी कप्तानसिंग याला बेदम मारहाण करुन त्याचा गळा आवळला (Pune Crime). त्यात कप्तानसिंग हा निपचित पडला होता. त्यानंतर तिने कप्तानसिंग उठत नसल्याचे शेजारच्यांना सांगितले.
घरमालकांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी कप्तानसिंग याला रुग्णालयात दाखल केले.
परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
शवविच्छेदन अहवालानुसार बेदम मारहाण आणि गळा आवळल्यामुळे मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हlनंद नाईकवाडी (Senior Police Inspector Brahmanand Naikwadi) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
Web Title :- Pune Crime | murder of husband by wife in mundhwa keshav nagar area
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Long Covid Signs | लाँग कोविडची अशी 5 लक्षणे ज्यांच्याकडे नेहमी केले जाते दुर्लक्ष ! जाणून घ्या
Moola In Winters | हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने होतील ‘हे’ 5 जबरदस्त फायदे! जाणून घ्या कोणते
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या भावात वाढ; जाणून घ्या आजचे दर