Pune Crime | पुण्यात अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून, मृतदेह बाथरुममध्ये आढळल्याने प्रचंड खळबळ
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | अनैतिक संबंधाला (Immoral Relations) नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून (Murder in Pune) केल्याची घटना (Pune Crime) पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत रविवारी (दि.7) उघडकीस आली आहे. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील बाथरुममध्ये (Bathroom) टाकून फरार झाला आहे. पोलिसांनी गुलाम मोहम्मद शेख Ghulam Mohammad Shaikh (वय-30 रा. पठारे वस्ती, संत नगर लोहगाव, मूळ रा. बिहार Bihar) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav) यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव (lohegaon) येथील मोझेआळी परिसरातील आरोपी गुलाम हा मयत महिलेच्या घरामध्ये भाड्याने राहात होता. दरम्यानच्या काळात त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण झाले. ही बाब मयत महिलेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला घर खाली करण्यास सांगितले. रविवारी (दि.7) दुपारी महिला घरामध्ये एकटी असताना आरोपी गुलाम हा घरी आला. त्याने तिचा बाथरुममध्ये गळा (Murder in Bathroom) आवळून खून केला.
खून केल्यानंतर आरोपी महिलेच्या घराला बाहेरून कुलूप लावून निघून गेला. महिलेचा पती आणि मुले कामावरुन घरी आल्यानंतर घराला कुलूप असल्याचे पाहिले. त्यांनी तिला संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी रात्री उशिरा घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील बाथरुममध्ये महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Pune Crime)
मयत महिलेच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलाम शेख याच्याविरोधात अनैतिक संबंधांना नकार दिल्याने गळा आवळून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap) हे करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | murder of a woman who refuses to have an affair the accused fled after throwing the body in the bathroom in lohegaon of vimannagar police station limits
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | 3 सराईत गुन्हेगारांना अटक, अलंकार पोलिसांकडून वाहनचोरीचे 11 गुन्हे उघडकीस
Comments are closed.