पुणे / आळेफाटा : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस
चौकीजवळ एका मोबाइल शॉपीत अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी मोबाइल शॉपीमधील वेगवेगळ्या कंपन्यांचे 12 लाख रुपये
किमतीचे मोबाइल चोरून नेले. ही घटना (Pune Crime) आज (सोमवार) सकाळी पहाटेच्या सुमारास घडली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आळेफाटा परिसरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी पाच दुकाने फोडून चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन गुगळे यांचे कल्याणनगर महामार्गावर असलेल्या त्रिमूर्ती प्लाझामध्ये कोहिनूर मोबाइल शॉपीचे दुकान आहे.
आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला.
दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल 100 हून अधिक मोबाइल, सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण 12 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,
सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी अज्ञाच चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title :- Pune Crime | mobile shop theft in alephata pune rural police station chowki cost of 12 lakhs mobile phone pune crime news
हे देखील वाचा :
Shreya Bugade | श्रेया बुगडे ‘या’ विनोदवीराची चाहती; त्याच्यासाठी केली खास पोस्ट शेअर
Solapur News | दिव्यांग निधी मिळवण्यासाठीच्या आंदोलनात बहिणीपाठोपाठ अल्पवयीन भावाचा मृत्यू
Pune Pimpri Crime | इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याने टोळक्याकडून मारहाण; तळेगाव दाभाडेमधील घटना
Pune Crime | प्लंबिंग कामगाराचा विजेचा शॉक बसून मृत्यू; ठेकेदारावर FIR, पुण्यातील घटना