पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (attempt to Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime) बोपोडी (bopodi) परिसरात घडली आहे. ही घटना आयटी पार्क समोरील रस्त्यावर बोपोडी (भाऊ पाटील रोड) येथे मंगळवारी (दि.27) सकाळी सातच्या सुमारास घडली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी एका 17 वर्षीय मुलाने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki police station) फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गणेश उर्फ घुल्या राजू शेट्टी (वय-26 रा. बोपोडी) याच्यासह इतर तिघांवर 307, 323, 504, 506(2), 34 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार मुलामध्ये काही दिवसांपूर्वी क्रिकेट
खेळताना वाद झाले होते. यानंतर फिर्यादी अल्पवयीन मुलगा मंगळवारी (दि.27) सकाळी सातच्या
सुमारास भाऊ पाटील रस्त्यावरील आयटी पार्कसमोर (IT Park) हातगाडी जवळ थांबला होता.
त्यावेळी चौघे आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी मुलाला जीवे मारण्याच्या उद्देशाने
कोयत्याने वार केले. पुढील तपास खडकी पोलीस (Khadki Police) करीत आहेत.
Web Title :- pune crime minor boy attacked by four over fight
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्राला दिलासा नाहीच; पुन्हा एकदा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला