पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | जमिनीच्या वादातून सख्या भावाला काठीने मारहाण (Beating) करुन कुर्हाडीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttamnagar Police) दोघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक (Pune Crime) केली आहे. सोमदास सखाराम मोकर Somdas Sakharam Mokar (वय – 55) आणि अविनाश बाळासाहेब पडर Avinash Balasaheb Padar (वय – 24, दोघे रा. अहिरेगाव, ता. हवेली) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी संजय सखाराम मोकर Sanjay Sakharam Mokar (वय – 43, रा. अहिरेगाव, ता. हवेली) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद दिली आहे. संजय मोकर यांच्यावर दिनानाथ हॉस्पिटलमध्ये (Deenanath Hospital) उपचार करण्यात येत आहेत. ही घटना अहिरेगावातील संजय मोकर यांच्या शेतात बुधवारी रात्री नऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय मोकर आणि सोमदास मोकर हे सख्ये भाऊ आहेत. त्या दोघांना मिळून 10 एकर जमीन असून ती त्यांच्या आजोबांच्या नावावर आहे. त्यांनी त्याची वाटणी केलेली नसून त्यांनी तोंडी वाटप करुन करत आहेत. सोमदास याच्या वाट्याच्या जमिनीत सार्वजनिक म्हसोबा मंदिर असून त्या मंदिरात जाण्याच्या कारणावरुन मागील काही दिवसांपासून सोमदास हा फिर्यादीला सतत शिवीगाळ व धमकी देत असे. ही बाब फिर्यादी यांनी त्यांचे नातेवाईक व गावातील लोकांना सांगितली होती.
फिर्यादी हे 6 जुलै रोजी शेतात काम करीत असताना सोमदास त्या ठिकाणी आला व फिर्यादीला शिवीगाळ करु लागला. फिर्यादी यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो समजून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने ते तेथून निघून गेले. या सततच्या त्रासाला कंटाळून काही लोक जमवून त्याला समजून सांगावे, यासाठी फिर्यादी यांनी मुलगा सौरी, भाचा निलेश कंधारे यांना घडलेली माहिती दिली. त्यांना घेऊन रात्री ते शेतात गेले. रात्री 9 वाजता सोमदास याला समजावून सांगण्यास ते गेले. तेव्हा अविनाश पडर हाही तेथे होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोमदास याला समजून सांगत असताना त्याने सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
आज तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.
फिर्यादी यांना वाचविण्यासाठी मुलगा सौरभ आला. सोमदास याने त्यालाही मारहाण केली.
त्याचवेळी तेथे असलेल्या अविनाश पडर हा अचानक हातात कुर्हाड घेऊन आला.
त्यावेळी सोमदास याने फिर्यादी यांना धरले व अविनाश याने त्यांच्यावर कुर्हाडीचा वार केला. तो फिर्यादीने हातावर घेतला.
त्यामुळे त्यांच्या डाव्या हातावर गंभीर जखम होऊन ते खाली कोसळले. हे पाहून दोघे पळून गेले.
फिर्यादी यांच्या मुलाने व भाच्याने त्यांना जखमी अवस्थेत दिनानाथ हॉस्पिटलला दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
Web Title :- Pune Crime | Land dispute with brother with ax incident in Ahiregaon FIR against both
हे देखील वाचा :
Sanjay Raut | ’धनुष्यबाण’ हातातून जाण्याची शक्यता; शिवसेना खासदार संजय राऊतांचे सूचक ट्विट
CM Eknath Shinde | CM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार, खातेवाटपावर चर्चा?