मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) हालचालींना आता वेग आला आहे. नव्या मंत्रिमंडळाचे (Cabinet) खातेवाटप कसे असणार याबाबत उत्सुकता असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचे वृत्त आहे. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांची भेट घेणार असल्याचे समजते. खातेवाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J.P. Nadda) यांच्याशी चर्चा करू शकतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवसेनेतील बंडखोर नेते (Shivsena Rebel Leader) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडाच्या पाठीमागे कोण होते हे आता लपून राहिलेले नाही. भाजपाच्या (BJP) सर्वोच्च नेत्यांचा त्यांना आशीर्वाद असल्याचे आता उघड झाले आहे. एकनाथ शिंदे यांचे दिल्ली (Delhi) दरबारी वजन वाढल्याचे यापूर्वी सुद्धा दिसून आले आहे. एकनाथ शिंदे यांची अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी लागलेली वर्णी खुप काही सांगून जाते.
राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर सुद्धा अमित शाह आणि मोदी यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे मोठे कौतुक करण्यात आले होते. आता आज (8 जुलै) दिल्लीत एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत होऊ शकते. महापालिका निवडणुकांच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आगामी राजकारण मोदी-शहा हे एकनाथ शिंदे यांच्यामाध्यमातून करू शकतात.
एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी दिल्लीसाठी रवाना होतील. पंतप्रधान मोदी आणि इतर भाजप नेत्यांना ते शनिवारी (9 जुलै) भेटणार आहेत.
ते पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांची भेट घेतील.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, खातेवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे एकटेच दिल्लीला रवाना होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे त्यांच्यासोबत जाणार आहेत किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही,
यामुळे विविध चर्चा सुरूआहेत. दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांचे वाढलेले वजन पाहता
आगामी काळात एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कारण मोदी-शहा यांनीच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्रीपद देऊ केले आहे.
Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde today will leave for delhi and will meet amit shah narendra modi on cabinet related decision and whom to give which department
हे देखील वाचा :
Maharashtra Congress | काँग्रेसनं मोठा निर्णय घेतल्यानं शिवसेनेला मोठा धक्का ?