पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करुन घरात शिरुन लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्रे ताब्यात घेऊन ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करुन मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) एका महिलेसह दोघांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी हवेली तालुक्यातील कोरेगाव मुळ गावातील एका 62 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्याच इमारतीत राहणारी रेश्मा शेख व एक जण 12 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या घरात शिरले. आम्ही सीबीआयचे अधिकारी असल्याची त्यांनी बतावणी केली. घरातील लॅपटॉप, मोबाईल, मोटारीचे स्टार्टर, कागदपत्रे व बँकेचे कागदपत्रे असा 31 हजार रुपयांचा माल घेतला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने गाडीत बसवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दमदाटी करुन आम्हाला दीड लाख रुपये द्या नाही तर तुमच्यावर खोटी केस करतो. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना खेड शिवापूर येथे सोडून ते पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.