पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | अजित नागरी पतसंस्थेच्या (Ajit Nagari Patsanstha) मॅनेजरने इतरांच्या मदतीने पतसंस्थेच्या सभासददारांच्या खात्यातील पैसे काढून घेऊन ८ लाख ६१ हजार ७०० रुपयांना गंडा (Fraud Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी सतीश महादेव जाधव Satish Mahadev Jadhav (वय ४७, रा. हरिओम सोसायटी, सासवड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११०४/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पतसंस्थेचा मॅनेजर अभिषेक संपत चोरघडे (Manager Abhishek Sampat Chorghade), सुगंधा अनिल बब्बे (Sugandha Anil Babbe), अभिजित बनसोडे (Abhijit Bansode) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या उरुळी देवाची शाखेत (Uruli Deva Branch) २९ ऑक्टोबर २०२० ते २० नोव्हेबर २०२० दरम्यान घडला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित नागरी पतसंस्थेच्या उरळी देवाची शाखेत अभिषेक चोरघडे हा मॅनेजर होता. त्याने इतर दोघांच्या मदतीने पतसंस्थेचे सभासद अतुल पवार (Atul Pawar) यांचे मुदत ठेव पावती खात्यावरील मोबाईल नंबर चेंज करुन देतो, असे बोलून वेळोवेळी खोट्या सह्या करुन त्याच स्वरुपाची दुसरी पावती करुन ८ लाख ६१ हजार ७०० रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली आहे. याबाबत तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक खेडकर (Sub-Inspector of Police Khedkar) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | It was the manager of Ajit Nagari Credit Institution who did the trick; FIR against Abhishek Chorghade, Abhijit Bansode
हे देखील वाचा :
Pune Crime | विनयभंगाची तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणीने पोलीस चौकीत केला आत्महत्येचा प्रयत्न
Bank Holidays | सप्टेंबरमध्ये 12 दिवस होणार नाही बँकांचे कामकाज, पहा सुट्ट्यांची पूर्ण यादी
New Rules From September 2022 | 1 सप्टेंबर पासून होणार मोठे बदल, सर्वसामान्यांवर होणार परिणाम