पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | ‘तु मला खूप आवडतेस’ असे म्हणत एका
12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation Case) करुन तिला जीवे मारण्याची
धमकी (Threats to Kill) देणाऱ्या एकावर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police
Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Pune Police) साजन
कांबळे Sajan Kamble (वय – 25) याच्यावर आयपीसी 354 ड, 448, 506 (2), पॉक्सो
अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत वडगाव शेरी (Wadgaon Sheri) परिसरात राहणाऱ्या पीडीत मुलीच्या आईने (वय – 33) येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी साजन कांबळे (वय – 25 रा. वडगाव शेरी) याच्यावर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.19) दुपारी सव्वाबारा व चारच्या सुमारास पीडित मुलगी राहात असलेल्या बिल्डिंगच्या पार्कींमध्ये घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वडगाव शेरी परिसरातील एका सोसायटीमध्ये राहतात.
आरोपीने फिर्यादी यांच्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बिल्डिंगच्या पार्कींगमध्ये अडवले.
‘तु मला खूप आवडतेस’ असे म्हणून तिचा विनयभंग केला.
तसेच ‘मी तुला बोलतो हे जर का तु तुझ्या आईला सांगितले तर मी तुला मारुन टाकीन’ अशी धमकी दिली.
यानंतर आरोपीने दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरात हातात चाकु (Knife) घेऊन आला आणि दमदाटी केली,
असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शेलार (PSI Shelar) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Incident in Yerwada area where a minor girl was raped and threatened with death
हे देखील वाचा :
Fiber Benefits In Diabetes | जाणून घ्या मधुमेहामध्ये फायबरयुक्त गोष्टींच्या सेवनावर भर का दिला जातो?