पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | रस्त्यात उभे असलेल्यांना हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करुन तिघांनी जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी (Pune Police) गौरव शिंदे ऊर्फ भैया आढाव Gaurav Shinde alias Bhaiya Adhaav (रा. कसबा पेठ) व त्याच्या दोन मित्रांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी राहुल राजेंद्र पवार Rahul Rajendra Pawar (वय २३, रा. गणेश पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १८४/२२) दिली आहे. हा प्रकार कसबा पेठेतील (Kasba Peth) माणिक चौकात ५ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मित्रांसोबत कोथरुड येथून गरबा दांडिया (Garba Dandiya)
खेळून मोटारसायकलवरून घरी येत होते. त्यावेळी गौरव शिंदे व त्याचे मित्र रस्त्यात उभे होते.
फिर्यादी यांनी हॉर्न वाजवला असता त्याचा राग मनात ठेवून गौरव शिंदे व त्याच्या मित्रांनी फिर्यादी यांचा पाठलाग
करुन त्यांच्याजवळील कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर व हातापायांना मारुन गंभीर जखमी केले.
फिर्यादी यांना शिवीगाळ करुन नदीत फेकून देतो, असे म्हणून त्यांची गाडी जबरदस्तीने घेऊन जाऊन मारहाण केली. आरोपींनी त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवून आमच्याशी नडणार्यांना आम्ही सोडत नसतो, हे लक्षात ठेवा,
असे म्हणून नागरिकांच्या दिशेने दगडफेक करुन दहशत पसरविल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक बोबडे (API Bobde) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Incident in Kasba Pethe, a young man was stabbed in the head with a coyote after blowing the horn crime news
हे देखील वाचा :
Samata Party | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निशाणी ‘मशाल’वर समता पक्षाचा आक्षेप
Kolhapur Crime | धक्कादायक! कोल्हापुरात शेती परवडत नसल्याने तरूण शेतकऱ्याची आत्महत्या