पुणे : बहुजननामा ऑनलाईन – येरवडा परिसरातील मध्यरात्री अग्निशमन केंद्राच्या समोर दुचाकीवर आलेल्या चोरट्यानी पिकअप अडवून दोघांना तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी ही घटना घडली आहे.
याप्रकरणी प्रवीण सावळे (वय 20) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यात दुचाकीवर आलेल्या चार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण वाघोली येथे राहतो. तो पिकअप चालवतो. दरम्यान तो रविवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास येरवडा येथुन वाघोली येथे जात होता. त्यावेळी तो येरवडा अग्निशमन दलाच्या केंद्रासमोर आल्यानंतर दोन दुचाकीवर चार चोरटे आले. त्यांनी दुचाकी आडवी लावत पिकअप थांबला. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवत 5 हजार रोकड व दोन मोबाईल असा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक रवींद्र आळेकर हे करत आहेत.