पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पोलिसांचा खबर्या असल्याने समजून तिघांनी एका तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार (Pune Crime) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) कझम ऊर्फ कझमफर हुमायुन इराणी (वय ३५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याला अटक केली आहे.
त्याचे साथीदार सय्यद नूर जानशा इराणी (वय ५२) आणि रुकसाना सय्यदनूर इराणी (वय ४५) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी हैदर शौकत शेख (वय २०, रा. महात्मा गांधी वसाहत, पाटकर प्लॉट, पाटील इस्टेटसमोर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (गु. र. नं. ३१२/२१) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिर्यादी हे मंगळवारी दुपारी त्यांचे आजीच्या दुकानात जात होते.
त्यांच्या वस्तीमध्ये राहणार्या आरोपी कझम इराणी याने त्याची व त्याच्या नातेवाईकांची खबर पोलिसांना देतात.
असे समजून फिर्यादीला पकडले. सय्यद व रुकसाना यांनी हाताने मारहाण केली.
कझम याने फिर्यादीच्या गळ्यावर चाकूने वार केला.
तसेच वस्तीतील लोकांवर चाकू व कोयता उगारुन दहशत निर्माण केली म्हणून गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime | In Pune, a young man was stabbed in the neck after understanding the news of the police! One arrested by Khadki police.
Shivsena MP Bhavana Gawali | …म्हणून शिवसेना खासदार भावना गवळी आज ED कार्यालयात हजर राहणार नाहीत