Pune Crime | मालमत्तेच्या वादातून भाऊबहिणींनी मिळून सख्या भावाला कॅनॉलमध्ये ढकलून देऊन केला खून; चार वर्षानंतर आला उघडकीस

Pune Crime | Due to a property dispute brothers and sisters got together and killed a brother by pushing him into a canal; It was revealed after four years

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | डेक्कन (Deccan) परिसरातील घर स्वत:च्या नावावर करण्यासाठी त्रास देत असल्याच्या कारणावरुन भाऊ व बहिणीने दोघांच्या मदतीने आपल्या सख्या भावाला कॅनॉलमध्ये ढकलून देऊन त्याचा खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

पंकज दिघे Pankaj Dighe (वय २३, रा. डेक्कन जिमखाना) असे खून (Murder) झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) सुहास दिघे (Suhas Dighe), आश्विनी आडसुळ (Ashwini Aadsula), प्रशांत आणि महेश बाबुराव धनपावडे Mahesh Baburao Dhanpawde (वय ३७, रा. देशमुखवाडी, शिवणे Shivane) याला अटक (Arrest) केली आहे.

 

याबाबत पोलीस हवालदार राजेंद्र मारणे (Police Constable Rajendra Marne) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९४६/२२) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी (Fursungi, Hadapsar) गावातील शिवशंभो देवस्थान ट्रस्टचे (Shivshambho Devasthan Trust) उसाचे शेताजवळ असलेल्या कॅनॉलमध्ये १८ मार्च २०१७ रोजी एक मृतदेह आढळून आला होता.
अकस्मात मृत्यु अशी त्यावेळी नोंद करण्यात आली होती.
त्याचवेळी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) पंकज दिघे याची बेपत्ता (Missing Case) म्हणून तक्रार दाखल करण्यात आली होती.
याबाबत तपास करत असताना तसेच साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत घराच्या वादातून पंकज दिघे याला कॅनॉलच्या पाण्यात ढकलून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघे यांचे एरंडवणा (Erandwane, Pune) येथे एका चाळीत घर आहे.
सुहास दिघे आणि त्यांची बहिण आश्विनी आडसुळ यांचा भाऊ पंकज दिघे हा त्यांना राहते घर स्वत:च्या नावावर करण्याकरीता त्रास देत होता.
त्या कारणावरुन त्यांनी प्रशांत व महेश धनपावडे यांच्यासमवेत कट रचला. १४ मार्च २०१७ रोजी सायंकाळी पंकज याला तवेरा गाडीत घालून पळवून नेले.
गाडीत मारहाण केली. त्याला हडपसर येथील कॅनॉलमध्ये ढकलून दिले.
त्यानंतर पाच दिवसांनी सुहास दिघे याने डेक्कन पोलीस ठाण्यात भाऊ पंकज दिघे हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, त्याच्याअगोदरच हडपसर पोलिसांना फुरसुंगी येथे एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता.
त्याची त्यावेळी ओळख पटली नव्हती. (Pune Crime)

 

गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट ३ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे
(Senior Police Inspector Anita More) व त्यांच्या सहकार्‍यांना पंकज दिघे याचा खून झाल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरुन पोलिसांनी बेपत्ता माहिती घेतल्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात १९ मार्च २०१७ रोजी पंकज दिघे हा बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.
त्यावरुन अनोळखी मृतदेहाची माहिती गोळा केल्यावर हडपसरमधील एक अनोळखी मृतदेहाचे वर्णन पंकज याच्याशी मिळते जुळते असल्याचे आढळून आले.
त्यावरुन पोलिसांनी महेश धनपावडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
तेव्हा त्याने या सर्व प्रकाराची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील (Sub-Inspector of Police Patil) तपास करीत आहेत.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Web Title : –  Pune Crime | Due to a property dispute brothers and sisters got together and killed a brother
by pushing him into a canal; It was revealed after four years

 

हे देखील वाचा :

Belly Fat | या 3 फळांचे रोज करा सेवन, पोटाच्या चरबीपासून होईल सुटका

Pune Pimpri Crime | ऑनलाईन केक मागवणं महिलेला पडलं महागात, ऑनलाईन पेमेंटद्वारे 1.67 लाखाची फसवणूक

Weight Loss Food | पाण्यात भिजवून खा हे Dry Fruit, कंट्रोलमध्ये राहिल तुमचे वजन