पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीने स्वत:च्या डॉक्टर पत्नीवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना विश्रांतवाडी येथे घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी डॉ. रवी भादवड (वय 36, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) याला अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी त्यांच्या पत्नीने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. डॉ. रवी हे मुंजाबा वस्ती येथे रहायला आहेत. तेथेच त्यांचे क्लिनिक आहे. त्यांची पत्नीही एमबीबीएस डॉक्टर आहेत. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर पती-पत्नीत कौटुंबिक वाद सुरु होते. याच वादातून रविवारी रात्री पत्नी झोपेत असताना डॉक्टराने तिच्यावर चाकूने वार केले. या प्रकाराने त्यांची पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पत्नीच्या फिर्यादीनंतर विश्रांतवाडी पोलिसांनी डॉ. रवी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम अधिक तपास करीत आहेत.
web title: Pune crime doctor husband attack on doctor wife in vishrantwadi pune.
Gold Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत आज जबदरस्त घसरण, खरेदीपूर्वी पहा नवीन भाव
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 215 नवीन रुग्ण, 233 रुग्णांना डिस्चार्ज